स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट   

प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच नष्ट

ब्राऊनसिल्वे : स्पेसएक्सच्या स्टारशिप या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर त्याचे अवशेष विविध भागांत विखुरले. दोन महिन्यांपूर्वी अशाच एका रॉकेटचा स्फोट झाला होता. 
 
गुरुवारी त्याचे चाचणीसाठी प्रक्षेपण व्यवस्थित झाले. पण, काही मिनिटांत त्याचा अवकाशात स्फोट झाला. ते कोसळले आणि नंतर त्याचे तुकडे झाले. स्फोटानंतर फ्लोरिडाच्या आकाशात धूर दिसला. तसेच त्याचे अवशेष विविध ठिकाणी अवकाशातून खाली कोसळत असल्याचे दिसले. ते नष्ट करण्याच्या यंत्रणेकडून ते जाणूनबुजून नष्ट करण्यात आले का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.  सुमारे १२३ मीटर उंचीचे रॉकेट आहे.  टेक्सास येथून ते प्रक्षेपित झाले. एका मोठ्या यात्रिक हाताला ते जोडले होते. त्यापासून ते विभक्त झाले. अवकाशात गेल्यावर अचानक त्याचे इंजिन बंद पडले. ते पूर्वेकडे झुकले आणि अनियंत्रित होत हिंद महासागराच्या दिशेने गेले. नंतर ते अधिकच अनियंत्रित झाले आणि स्वत:भोवती घिरट्या घेत राहिले. तेव्हा ते  सुमारे १५० किलोमीटर उंचीवर होते. आगीने वेढलेले रॉकेटचे अवशेष
 
कोसळतानाची दृश्ये अनेकांनी फ्लोरिडा येथे टिपली. कसेबसे एक तास ते अवकाशात होते. अर्थात रॉकेटची दुसरी चाचणी अयशस्वी झाली असून आता आणखी काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया  स्पेसएक्सशचे कमांडर हॅन ह्यूओत यांनी दिली. 

Related Articles