पॅरिसच्या रेल्वेमार्गावर सापडलादुसर्‍या महायुद्धातील बाँब   

लंडनसह युरोपातील सेवा बंद

पॅरिस : पॅरिसच्या रेल्वे मार्गावर दुसर्‍या महायुद्धातील एक बाँब सापडला. त्यामुळे लंडन आणि ब्रसेल्सकडे धावणारी रेल्वेसेवा शुक्रवारी विस्कळीत झाली. पर्यायाने गजबजलेल्या स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या उभ्या राहिल्याचे चित्र दिसून आले. दिवसाला सुमारे ७० हजार जण प्रवास ब्रिटन आणि युरोप खंडात करतात. त्यांना फटका बसला.युरोस्टार, असे अतिवेगाने रेल्वेसेवा पुरविणार्‍या कंपनीचे नाव आहे. ब्रिटन आणि युरोपीय खंडात सेवेचे जाळे विस्तारले आहे. रेल्वेमार्गावर दुसर्‍या महायुद्धातील बाँब सापडल्याचे वृत्त पसरले. तसेच रेल्वेसेवा तातडीने बंद करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरण्याबरोबरच इशारा देणारे लाल सिग्नल विविध रेल्वेसथानकांत दिसले. त्यामुळे अनेकजणांच्या प्रवासाचे स्वप्न भंगले. असेच चित्र फ्रान्स ते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सच्या मार्गावर होते. 
 
दुपारपर्यत पॅरिसकडून धावणारी रेल्वेसेवा बंद करण्यात आल्याची घोषणा केली. लंडन येथील सेंट पॅनक्रास रेल्वेस्थानक ते पॅरिस, असा प्रवास करणार्‍यांना देखील फटका बसला. यानंतर अनेकांनी रेल्वेऐवजी विमान प्रवास करण्याचा विचार सुरु केला. फ्रान्स ते ब्रिटन धावणारी रेल्वे खास अशा बोगद्यातून आणि युरोप खंडासाठी  प्रवास करते. दरम्यान, पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातील बाँब फ्रान्समध्ये सापडत आले आहेत. पण, सार्वजनिक ठिकाणी सहसा सापडत नाहीत, अशी माहिती फ्रेंच रेल्वेने दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार रेल्वेसेवा बंद केली असल्याचे सांगितले. 

Related Articles