अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या   

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. प्रवीण कुमार गंपा (वय-२७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो विस्कॉन्सिन विद्यापीठात शिक्षण घेत होता. तसेच, एका दुकानात अर्धवेळ नोकरीही करत होता. 
 
अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे दरोड्याच्या उद्देशाने काही जण दुकानात आले होते. दरोडा टाकताना त्यांनी गोळीबार केला. एक गोळी प्रवीण कुमार याला लागली. यातच त्याचा मृत्यू झाला. प्रवीणच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. पहाटे मुलाचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. पण, आमच्या लक्षात आले नाही. आम्ही मिस्ड कॉल पाहिल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, असे प्रवीणच्या वडिलांनी सांगितले. 

Related Articles