रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला   

कीव :रशियाने बुधवारी रात्री युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे मूळ गाव असलेल्या ठिकाणी एका हॉटेलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले, त्यात चार जण ठार झाले. झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनियन, अमेरिकन आणि ब्रिटीश नागरिकांसह मानवतावादी संघटनेचे स्वयंसेवक हल्ल्यापूर्वी मध्य युक्रेनमधील क्रिवी रिह येथील हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, ३१ जखमींमध्ये हे लोक आहेत की नाही हे त्यांनी सांगितले नाही. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले, की रशियाने रात्रभर युक्रेनवर ११२ शाहिद आणि दोन बॅलिस्टिक इस्कंदर क्षेपणास्त्रे डागली.

Related Articles