विकासाच्या नियोजनासाठी १ हजार कोटी युरोची गुंतवणूक   

तळेगावमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प सुरू 
 
पुणे : भारतात उत्पादन क्षमता वाढविणे आणि विकासाच्या नियोजनासाठी डानफॉस पावर सोल्युशन्स या उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नामांकित कंपनीकडून १ हजार कोटी युरोची पुण्यात गुंतवणूक केली जाणार आहे. त्यासाठी तळेगाव येथील सात एकर परिसरात नव्याने ग्रीनफिल्ड प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली आहे.
 
डानफॉस पावर सोल्युशन ही जगातील मोबाईल आणि इंडस्ट्रीयल हायड्रॉलिक्स तसेच इलेक्ट्रीक पावरट्रेन प्रणालीची अग्रगन्य पुरवठादार कंपनी आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे उत्पादन क्षमता वाढीस मोठी मदत मिळणार आहे. तसेच, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला अधिक चालना मिळेल. डानफॉस समूहाने उत्पादन संशोधन आणि विकास क्षमता भारतात सर्वत्र वाढविल्या आहेत. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासामध्ये मोठी वाढ होत आहे. तसेच, या कंपनीचा स्थानिक स्तरावर गुंतवणुकीसाठी अधिक भर असणार आहे. विशेष म्हणजे, तळेगाव येथील ग्रीनफिल्ड प्रकल्प हे भारतातील सातवे उत्पादन केंद्र आहे.
  
नव्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाद्वारे मुख्यत: पंप, मोटार, सिलेंडर आणि वॉल्वचे उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली जाणार आहे. यासह ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्याकरीता पुढे नवीन उत्पादन लाईन सुरू केली जाणार आहे. टिकाऊ असे नवे उपक्रम राबवून जागतिक डिकार्बनायझेशन ऑपरेशनला प्रोत्साहन दिले जाईल. ’भारताकडे भक्कम अशा औद्योगिक विकासाची क्षमता आहे. या गुंतवणुकीमुळे डानफॉसची क्षमता विकासाकरिता नक्कीच अधिक फायद्याची ठरेल. नवीन सुविधांमुळे स्थानिक आणि उच्च गुणवत्ता देणार्‍या उपाययोजना राबवुन विकासांचे एक महत्वाचे पाऊल टाकले जाईल, असे डानफॉस पावर सोल्युशनचे डॅनियल विटर यांनी सांगितले.

Related Articles