शेअर बाजार घसरला   

मुंंबई : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सोमवारी घसरण झाली. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात वाढ झाली होती. मात्र, तो बंद होताना निर्देशांकात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७३.४८ ने घसरून ८१ हजार १५१.२७ वर बंद झाला. निफ्टीत ७२,९५ ने वाढ झाली आणि तो २४ हजार ७८१.१० वर बंद झाला. एका क्षणी तो ५४५ ने वाढला नंतर तो ९५८ ने घसरला. त्यामुळे निर्देशांकात चढ आणि उतार पाहावयास मिळाले. कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसिर्व्ह, इंडसलँड बँक, अदानी पोर्टण अल्ट्रा टेक सिमेंट, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि जेएसडब्लू स्टीलचे समभाग घसरले.  या उलट एचडीएफसीने समभाग ३ टक्क्यांनी वाढले. एशियन पेंटस, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रिज, मारुती अणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरले. 

Related Articles