सिद्धेश्वरी मंदिराचे उद्या उद्घाटन   

आगरताळा : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्या हस्ते पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील सिद्धेश्वरी मंदिराचे उद्या (सोमवारी) उद्घाटन होणार आहे. 
 
हे मंदीर बरकाथल येथे आहे. सोहळ्याप्रसंगी त्रिपुरा राजघराण्यातील प्रद्योत किशोर मानिय देबर्मा हे देखील उपस्थित राहणार आहेत. शांती काली आश्रमाकडे या मंदीराचे व्यवस्थापन आहे. पर्यटन मंत्री सुशांता चौधुरी यांनी नुकतीच या सोहळ्याची आढावा बैठक घेतली. दरम्यान, महाराजा चित्तरंजन देबर्ता शांती काली आश्रमाचे प्रमुख आहेत. त्यांना गेल्या वर्षी हिंदू संस्कृती, परंपरा व धर्म यांच्या जतनाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

Related Articles