E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अट्टल गुन्हेगार असिफ दाढीने घेतली अजित पवारांची भेट
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
पिंपरी : पुण्यातील गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवडमधील अट्टल गुन्हेगार असिफ दाढी याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. असिफ दाढी हा अजित पवार यांना भेटल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
असिफ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तो एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे. असिफ दाढी हा तृतीयपंथीयांसाठी काम करणार्या एका संस्थेशी जोडलेला असल्याचेही समजत आहे.
असिफ दाढी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर 1988 मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर 1996 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. 2002 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा, 2004 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला.
2007 मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल आहे. 2009 आणि 2011 मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये त्याच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.
पुण्यातील गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीवरून राज्यात मोठे वादंग निर्माण झाले. ही भेट चुकीची असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते.
तसेच आपण याबाबत काळजी घेऊ, असेही त्यांनी आश्वस्त केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतली.
या भेटीला अवघे काही तास झालेले असतानाच आता अट्टल गुन्हेगार असिफ दाढी हा अजित पवार यांना भेटल्याचा फोटो समोर आल्याने राजकीय नेत्यांचे
गुन्हेगारांसोबतच्या राजकीय कनेक्शनची चर्चा जोरात सुरू आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
08 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
08 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
08 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा