E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
मिळकत कर विभागाला २ हजार ३५० कोटींचे उत्पन्न
पुणे
: महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मिळकत-करामधून २ हजार ३५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाला सर्वाधिक २ हजार ६०० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाबातीत बांधकाम विभाग अव्वल ठरला आहे.
महापालिका प्रामुख्याने मिळकत कर आणि बांधकाम विभाग यामधून प्रत्यक्ष उत्पन्न मिळत असते. राज्य सरकारकडून जीएसटीचे अनुदान मिळत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी बांधकाम विभागाकडून उत्तम प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सोपी बांधकाम परवानगीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम विभागात बांधकाम परवानगी अतिषय कमी वेळात मिळत असते. यावर्षी बांधकामाचे ३ हजार ३५९ प्रस्ताव बांधकाम विभागाने मान्य केले आहे.
पुणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरात बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. मेट्रोमुळे एफएसआयमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरात पायाभुत सुविधांचा विकास झाला आहे. त्यामुळे पुण्यात घरे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यावसायाच्या दृष्टीने सुध्दा पुणे जलद गतीने विकसीत होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल उभे राहत आहेत.
महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून दोन हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकत कर विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. दरम्यान, १ एप्रिल २०२३ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत २१३६ कोटी ०८ लाख २४ हजार ६३४ मिळकत कर जमा झाला होता. मागील आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत २१३६ कोटी ०८ लाख २४ हजार ६३४ कर जमा झाला होता. तर चालू आर्थिक वषार्त म्हणजे १ एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत २२२९ कोटी ०९ लाख ५१ हजार ०१९ महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
पुणे राहणीमानाच्या दृष्टीने उत्कृष्ट शहर आहे. त्याचबरोबर पायाभुत सुविधा, पाणी यांची चांगली व्यवस्था आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने पुण्याचा विकास होत आहे. त्यामुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळे शहरात निवासी आणि व्यापारी संकुलांमध्ये वाढ झाली आहे. बांधकाम परवानगीची यंत्रणा अतिषय सुटसुटीत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे.
प्रशांत वाघमारे, शहर अभियंता महापालिका
Related
Articles
मुंबईचा चेन्नईविरुद्ध बलाढ्य विजय
21 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
पीएमपीच्या ताफ्यातील नवीन १२३ सीएनजी बस सदोष
19 Apr 2025
महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी : शेट्टी
22 Apr 2025
वढेरा यांची पुन्हा ईडी चौकशी
18 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
मुंबईचा चेन्नईविरुद्ध बलाढ्य विजय
21 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
पीएमपीच्या ताफ्यातील नवीन १२३ सीएनजी बस सदोष
19 Apr 2025
महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी : शेट्टी
22 Apr 2025
वढेरा यांची पुन्हा ईडी चौकशी
18 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
मुंबईचा चेन्नईविरुद्ध बलाढ्य विजय
21 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
पीएमपीच्या ताफ्यातील नवीन १२३ सीएनजी बस सदोष
19 Apr 2025
महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी : शेट्टी
22 Apr 2025
वढेरा यांची पुन्हा ईडी चौकशी
18 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
मुंबईचा चेन्नईविरुद्ध बलाढ्य विजय
21 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
पीएमपीच्या ताफ्यातील नवीन १२३ सीएनजी बस सदोष
19 Apr 2025
महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी : शेट्टी
22 Apr 2025
वढेरा यांची पुन्हा ईडी चौकशी
18 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
ससूनचा अहवाल सादर