E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
२०२४-२५चा लेखा जोखा
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
धनंजय दीक्षित
dhananjay@kalyanicapital.com
गेल्या वर्षांमध्ये निफ्टी व सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांच्या पातळीमध्ये अनुक्रमे ५.३४ टक्के व ५.०४ टक्के वाढ दिसून आली, तर बँक निफ्टीमध्ये ९.४२ टक्के वाढ बघायला मिळाली. खाली दिलेले कोष्टक पाहिल्यास एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, ती म्हणजे तिन्ही निर्देशांकाचा सर्वोच्च बिंदू हा वरील कालावधीच्या बरोब्बर अर्ध्यावर म्हणजे २७/३० सप्टेंबर या दिवशी नोंदला गेला.
स्मॉलकॅप निफ्टी या निर्देशांकातील वाढ ५.८ टक्के तर मिडकॅप निफ्टीमधील वाढ ही ८.३७ टक्के एवढी होती. गेल्या संपूर्ण वर्षात परदेशी वित्तसंस्थांनी ३,९९,९३९.६९ कोटी रुपये एवढी निव्वळ विक्री केली, तर त्या समोर भारतीय वित्तसंस्थांनी ६,०८,०३४.५९ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. यात मोलाचा वाटा तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडात एसआयपीद्वारे गुंतवलेल्या पैशांचा आहे. अगदी १० वर्षांपूर्वी सुद्धा परदेशी वित्तसंस्थांना शिंक जरी आली तरी भारतीय शेअर बाजारांना हुडहुडी भरायची. आता ही परिस्थिती पार बदलली आहे. ही एक प्रकारची आत्मनिर्भरताच आहे नाही का? आणि काही ट्रिव्हिया बाजारातील तेजी ही भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर चालू झाली व अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक निकालानंतर उतरणीला लागली. या उतरणीच्या काळातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने दोनदा व्याजदर कपात केली, तर भारतीय रिझर्व बँकेने एकदा; परंतु त्याने फक्त उतरण सौम्य झाली. एरवी या दोन्ही घटनांनी जे तेजीचे उधाण आले असते ते काही दिसून आले नाही आणि याचे एकमेव कारण म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या धमक्यांची भीती. सद्यस्थितीत २ एप्रिल ही फाशीची तारीख ट्रम्प यांच्याकडून जाहीर केली गेली आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही हे फक्त काळच सांगू शकेल. त्यातून आधीचा दिवस सर्वांचा लाडका- एप्रिल फूलचा त्या दिवशी ट्रम्प काही फिरकी ताणतात का ते बघायचे.
निर्देशांक
मागील वर्ष २८ मार्च २०२४
सरते वर्ष २८ मार्च २०२५
सर्वोच्च बिंदू (तारीख)
निफ्टी
२२,३२६.९०
२३,५१९.३५
२६,२७७.३५ (२७/०९/२०२४)
बँक निफ्टी
४७,१२४.८०
५१,५६४.८५
५४,४६७.३५ (३०/०९/२०२४)
सेन्सेक्स
७३,६५१.३५
७७,४१४.९२
८५,९७८.२५(२७/०९/२०२४)
Related
Articles
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस
05 Apr 2025
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
09 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
06 Apr 2025
वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित
10 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस
05 Apr 2025
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
09 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
06 Apr 2025
वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित
10 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस
05 Apr 2025
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
09 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
06 Apr 2025
वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित
10 Apr 2025
पुणेकर उकाड्याने हैराण...!
11 Apr 2025
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस
05 Apr 2025
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
09 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
06 Apr 2025
वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित
10 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस