E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
वॉशिंग्टन
: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून आयात होणार्या मोटारीवर २५ टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. यातून अमेरिकेला दरवर्षी १०० अब्ज डॉलरचा महसूल मिळणार आहे. अमेरिकेत परदेशी मोटारीसाठी आयात होणार्या साहित्यावरही हा कर लागू होणार आहे. येत्या ३ एप्रिलपासून नवे कर लागू होणार आहेत. मात्र, एखादी परदेशी कंपनी अमेरिकेत मोटार तयार करत असेल तर त्या मोटारीवर हा कर लागणार नाही.
अमेरिकेतील ऑटो व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र, या निर्णयाचा जागतिक स्तरावर मोटार उत्पादक कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोटार उत्पादक कंपन्यांच्या समभागावर परिणाम पाहायला मिळाला. अनेक मोठ्या मोटार उत्पादक कंपन्यांचे समभाग कोसळले. येत्या काळात हा निर्णय मागे घेतला जाईल का? असा सवाल ट्रम्प यांना केला असता हे दीर्घकालीन धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण, अमेरिकेत तयार होणार्या परदेशी मोटारींसाठी हा कर नसेल, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेला मेक्सिको सर्वाधिक मोटारी पुरवतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, जपान, कॅनडा आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात आयात वाहनांवर २५ टक्के कराची घोषणा केली होती. मात्र, फारशी माहिती दिली नव्हती.येत्या २ एप्रिलपासून ट्रम्प प्रशासन अनेक कर लागू करत आहे. आता आयात मोटारीचा यात समावेश होत आहे. अमेरिकेचे व्यापारी भागीदार त्यांच्यावर अन्यायकारक कर लादतात. त्यामुळे आयात वस्तूंवर कर लावणे आवश्यक असल्याचे व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे.
Related
Articles
गोखले इन्स्टिट्युटच्या सचिव आणि सहकार्यांवर गुन्हे
06 Apr 2025
चेटीचंड महोत्सवातून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन
05 Apr 2025
हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत
09 Apr 2025
रुग्णालयाने दिला होता मुल दत्तक घेण्याचा सल्ला
05 Apr 2025
धोनीचे सर्वोत्तम यष्टीरक्षण
10 Apr 2025
दर कपात आणि अस्थिरता (अग्रलेख)
11 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस