E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
निलेश निकम यांचा आरोप
पुणे : महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक निलेश निकम यांनी केला आहे. थेट कंपनीकडून डांबर खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्युडी) असलेल्या ‘अॅप’मुळे सदर ठेकेदार नेमका कोणाला डांबर पुरवठा करतो याविषयी शंका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पूर्वी महापालिका रस्त्यांच्या कामासाठी थेट पेट्रोल उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करीत होते. त्यामुळे महापालिकेला प्रति टनामागे साडे सहा ते सात हजार रुपये इतकी सवलत मिळत होती. परंतु गेल्या तीन वर्षापासून महापालिकेकडून थेट कंपनीकडून केली जाणारी डांबर खरेदी बंद केली गेली. तीन वर्षापूर्वी महापालिकेने डांबर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर दरवर्षी ही निविदा काढली जात आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराची कंपनी या निविदेत पात्र ठरेल अशा अटी या निविदा प्रक्रीयेत टाकण्यात आल्याचा दावा निकम यांनी केला. पेट्रोल उत्पादक कंपन्या या सरकारी असल्याने त्यांच्याकडून डांबर खरेदीत ‘कमिशन’ मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केला.
ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत काढण्यात आलेल्या निविदांचा संदर्भ देत, निकम म्हणाले, ‘या कालावधीत महापालिकेच्या नोंदीनुसार दोन हजार ३०१ मेेट्रीक टन डांबर खरेदी केले गेले. या खरेदीत अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचार आहे. डांबराचे दर हे पंधरा दिवसांनी बदलतात, सदर ठेकेदार हा महापालिकेला डांबराच्या प्रचलित दराच्या सहा टक्के कमी दराने डांबर पुरवठा करीत आहे. प्रत्यक्षात महापालिकेने थेट डांबर खरेदी केले तर, आणखी कमी दराने ते उपलब्ध होऊ शकते, असा दावा निकम यांनी केला.
अधिकार्यांशी संगनमत?
सदर ठेकेदाराकडून डांबराची मालमोटार प्लांटमध्ये पाठविला गेल्यानंतर तेथे डांबराची चोरी होते. मालमोटारपूर्णपणे खाली केला जात नाही. अशाप्रकारे दहा मालमोटार डांबराची चोरी झाली आहे, असा आरोप निकम यांनी करीत, यात महापालिकेचे अधिकारी सामिल असल्याचा दावा केला.
’अॅप’मध्ये होते नोंद
पेट्रोल उत्पादक कंपन्यांकडून पीडब्ल्युडी विभागाला ’अॅप’ पुरविले आहे. या अॅपमध्ये कंपन्यांकडून डांबर खरेदीची माहीती चलनाद्वारे कळते. या अॅपमध्ये झालेल्या डांबराची खरेदी ठराविक भागात आणि विशिष्ट कामासाठी केली गेल्याची नोंद होते. कंपन्यांकडून दिल्या जाणार्या चलनात याची नोंद असते, या चलनातून डांबर दुसरीकडे कोठे विक्री केल्याचा प्रयत्न केला तर त्याचा तपशील दाखविते. महापालिकेला डांंबर पुरवठा करणार्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्युडीला विक्री केले आहे, असा आरोप निकम यांनी केला.
Related
Articles
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
मोटार-एसटी बस अपघातात एक ठार
04 Apr 2025
दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू
06 Apr 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे समाजाचे ध्रुवीकरण : सोनिया
04 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
4
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
5
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
6
निवार्याचा हक्क (अग्रलेख)