E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे विभागातून धावणार उन्हाळी विशेष गाड्या
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
पुणे : उन्हाळी सुट्ट्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध मार्गावर धावणार्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशलच्या २४ फेर्या होणार आहेत. वातानुकूलीत साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी ८ एप्रिल ते २४ जून दरम्यान पुण्याहून दुपारी ३.५० वाजता दर मंगळवारी सुटेल आणि नागपूरला दुसर्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. हीच गाडी नागपूरहून दर बुधवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला २२ डबे असणार आहेत.
या गाडीला उरुळी, दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे.
दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल आठवड्यातून ५ दिवस धावणार आहे. या गाडीच्या ५ एप्रिल ते २ जुलै दरम्यान १२८ फेर्या होणार आहेत. ही गाडी दौंड येथून पहाटे ५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सकाळी ११.२० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता दौंडला पोहोचेल. या गाडीला १२ डबे असणार आहेत. भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रस्ता, बोरोटी, दुधनी आणि गणागापूर या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
Related
Articles
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
03 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
ट्रम्प टॅरिफ आणि ऑटोमोबाइल उद्योग
31 Mar 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
03 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
ट्रम्प टॅरिफ आणि ऑटोमोबाइल उद्योग
31 Mar 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
03 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
ट्रम्प टॅरिफ आणि ऑटोमोबाइल उद्योग
31 Mar 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
03 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
ट्रम्प टॅरिफ आणि ऑटोमोबाइल उद्योग
31 Mar 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात