E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सलामीचा सामना
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
कोलकाता : यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या १८ व्या हंगामातील सलामीच्या लढतीत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गत विजेता कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. २२ मार्चला ईडन गार्डन्सच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येईल. रॉयल चॅलेंजर्स संघ म्हटले की, विराट कोहली केंद्रस्थानी असणारच. पण सलामीच्या लढतीतसह एकंदरीत स्पर्धेत रजत पाटीदार हा देखील लक्षवेधी चेहरा ठरू शकतो.विराट कोहली संघात असताना आरसीबीच्या संघाने त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवलीये. तो आघाडीच्या फलंदाजीतील प्रमुख खेळाडू आहे. संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यासाठी फलंदाजीतील कर्तृत्वासह त्याला नेतृत्वाची धमक दाखवून दुहेरी भूमिका पार पाडण्याचे चॅलेंज आहे.
२०२१ मध्ये बंगळुरु संघाकडून पदार्पण करणार्या रजत पाटीदार पहिल्या हंगामात फक्त ४ सामने खेळला. पण २०२२ च्या हंगामात त्याच्या भात्यातून ८ सामन्यात ३३३ धावा आल्या होत्या. याच हंगामात त्याने ११२ धावांच्या नाबाद खेळीसह आयपीएलमधील सर्वोच्च खेळी साकारली.
या शतकाशिवाय आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने २७ सामन्यात ७ अर्धशतकासह ७९९ धावा केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बंगाल विरुद्धच्या सामन्यात त्याने १३२ धावांची नाबाद खेळी केली होती. रणजी सामन्यातही केरळविरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ९२ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेटमधील मागील सामन्यातील आकडेवारी ही आगामी आयपीएलमध्ये तो धमाकेदार कामगिरी करण्यासाठी तयार असल्याचा एक पुरावाच आहे.
रजत पाटीदार कोलाकाता नाईट रायडर्स विरुद्ध आतापर्यंत फक्त ३ सामने खेळला आहे. यात एका अर्धशतकाच्या मदतीने त्याच्या खात्यात ५६ धावांची नोंद आहे. जमेची बाजू ही की, याआधी गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली होती. २३ चेंडूत त्याने ५२ धावांची खेळी केली होती. ही खेळी कोलकाताच्या मैदानातच आली होती. कर्णधार रजत पाटीदार शिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात विराट कोहली, फिल सॉल्ट, लायम लिव्हिंगस्टोन आणि क्रणाल पांड्या यांच्यासह गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड हे असे खेळाडू आहेत जे एकहाती सामना फिरवू शकतात.
Related
Articles
न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून पाहणी
27 Mar 2025
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
01 Apr 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वाचक लिहितात
31 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून पाहणी
27 Mar 2025
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
01 Apr 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वाचक लिहितात
31 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून पाहणी
27 Mar 2025
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
01 Apr 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वाचक लिहितात
31 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून पाहणी
27 Mar 2025
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
01 Apr 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वाचक लिहितात
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
5
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार