E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कसब्यातील भुयारी मार्गांच्या 'डीपीआर' निर्मितीला हिरवा कंदील
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनास सूचना
पुणे
:पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने दररोज हजारो नागरिक या भागामध्ये येत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या भुयारी मार्गांच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होईल.
याबद्दल आमदार हेमंत रासने म्हणाले, "दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनास केल्याने भुयारी मार्ग निर्मितीस गती मिळणार आहे".
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी एस तेलंग, अव्वर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.
Related
Articles
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवताचे दर्शन
30 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात निलंबित
26 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
5
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार