E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
डुनेडिन : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-२० मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतला.पाकिस्तानकडून तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या चेंडूवर सेफर्टने फ्रंटफुटवर येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसर्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला.
षटकाच्या तिसर्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफर्टने पुन्हा षटकार लगावले. आफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरला. त्याने एकाच षटकात २६ धावा दिल्या.संपूर्ण सामन्यात टिम सफर्टने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, टी २० क्रिकेटमधील १० वे अर्धशतक झळकवेल, असे वाटत असताना तो ४५ धावांवर बाद झाला. त्याने २२ चेंडूमध्ये २०४.५५ स्ट्राईक रेटने ४५ धावा कुटल्या. यावेळी त्याने एकूण ३ चौकार आणि ५ षटकार लगावले. दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज महमद अली याने त्याला बाद केले.
शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, दुसर्या टी-२० सामन्यात त्याने एकूण तीन षटके टाकली. दरम्यान, त्याने ६.७० च्या इकॉनॉमीसह ३१ धावा केल्या. मात्र त्याला काही यश मिळाले नाही. ड्युनेडिनमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात १५ षटकांत नऊ गडी गमावून १३५ धावा केल्या. विरोधी संघाने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य किवींच्या संघाने १३.१ षटकांत पाच गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान सेफर्टने २२ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले तर फिन ऍलनने १६ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले.
Related
Articles
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
अवकाळीने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला
03 Apr 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
01 Apr 2025
म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात