E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
अशोक सराफ यांचे प्रतिपादन
पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ अशोक सराफ यांना जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला, यावेळी सराफ बोलत होते. यावेळी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे उपस्थित होते.
सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे.
नागराज मंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे, तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खर्या जीवनातला देखील हिरो आहे.
रामदास फुटाणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे. याप्रसंगी सुनिता झाडे, फेलिक्स डिसोजा, सफर अली इसफ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
Related
Articles
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
चांद्रयान-५ मोहिमेला हिरवा कंदील
18 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
चांद्रयान-५ मोहिमेला हिरवा कंदील
18 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
चांद्रयान-५ मोहिमेला हिरवा कंदील
18 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
चांद्रयान-५ मोहिमेला हिरवा कंदील
18 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी