बीजेडी नेते राजा चक्र यांना अटक   

खाण गैरव्यवहार प्रकरण

भुवनेश्वर : कोट्यवधी रुपयांच्या खाण आणि वाहतूक गैरव्यवहारप्रकरणी ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिजू युवा जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष सौम्य शंकर चक्र उर्फ राजा चक्र यांना गुरुवारी अटक केली. अटकेपासून हंगामी संरक्षण देण्याचा चक्र यांचा अर्ज ओरिसा उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला होता.    अतिरिक्त पोलिस महासंचालक विनयतोष मिश्रा म्हणाले, गंधमर्दन लोडिंग  एजन्सी आणि ट्रान्सपोर्टिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कामकाजात अनियमितता आणि खनिज समृद्ध केंझर जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या निधीचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. खाण कामामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कल्याणासाठी या सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. २०१७-१८ ते २४ मार्च या कालावधीत लोडिंग एजन्सीने १८५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
 

Related Articles