युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा   

दुबई : भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. धनश्रीशी घटस्फोटाच्या बातम्या थांबल्या नव्हत्या आणि चहलच्या अफेअरच्या चर्चा जरा जास्तच रंगू लागल्या.  चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडले होते तेव्हा दोघेही एकत्र दिसले होते. दरम्यान, धनश्री वर्माचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती भावनिक झालेली दिसत आहे.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. युजवेंद्र चहलनेही एका पोस्टद्वारे स्पष्ट केले होते की, तो आणि धनश्री सध्या एकत्र नाहीत. मात्र, दोघांनीही या मुद्द्यावर उघडपणे स्पष्ट बोलणे टाळले. आता, नवीन डेटिंगच्या चर्चेत धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये ती भावनिक झाली. खरंतर, ’बी हॅपी’ चित्रपट पाहिल्यानंतर धनश्री बाहेर आली आणि तिने सांगितले की, मी भावनिक होत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काही लोक धनश्रीच्या भावनिक वक्तव्याचा संबंध चहलच्या अफेअरच्या अटकळीशी जोडला. महविश आणि चहल हे दोघेही एका हॉटेलमध्ये एकत्र दिसले, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आली. 
 

Related Articles