बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश   

द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेवर कारवाई 

बंडगार्डन : द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेच्या प्रशासनाने आरटीआय मोफत शिक्षण कायद्याचे उल्लंघन केले. तसेच १ ते ४ वर्ग अनधिकृत आढळल्याने गटशिक्षणधिकार्‍यांकडून शाळा बंद करण्याचा आदेश दिल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून शिक्षण अधिकार्‍यांचे कौतुक करण्यात आले.
 
अनेक वर्षापासून शासनाच्या शिक्षण कायद्यानुसार शाळा सुरू नसल्याने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण अधिकार्‍यांकडून सध्या कारवाई सुरू केली आहे. सध्या पुणे शहराच्या सर्व भागात बेकायदा शाळेची संख्या वाढत आहे. यामुळे पालक ही कोणती ही तपास न करता आपल्या मुलांना शाळेत दाखल करत आहेत. मात्र पुणे विभागाच्या अधिकार्‍यांना जाग आल्याने सध्या बेकायदा  शाळेवर कारवाईला जोर आला आहे. पुणे कॅम्प येथील द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेत अधिकारी तपास करण्यासाठी गेले असता १ ते ४ वर्ग अनाधिकृत आढळले. तसेच शाळा मान्यतबाबतची कागदपत्राची मागणी केल्यावर कोणत्या कागदपत्राची पुर्तता करण्यात आली नाही. शासकीय नियमाप्रमाणी नोटीस दिल्यावर संस्थेने शाळा बंद करणे अपेक्षित आहे. शिवाय एक लाख रूपये दंड भरणे आवश्यक होते. जर वर्ग बंद न केल्यास प्रत्येक दिवशी दहा हजार रूपये दंड भरावा लागेल असा ही आदेश गटशिक्षणधिकार्‍यांनी काढला आहे. 
 
बेकायदा शाळेमुळे शहरात स्थानिक पालक आणि कार्यकर्त्यामध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. लाखो रूपये फि भरून ही अनधिकृत शाळा नागरिकांची दिशाभूल करत आहेत. घराच्या जवळ असल्याने अनेक पालक कोणती ही चौकशी न करता मुलांना बेकायदा शाळेत भरती करत आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या सतर्कतमुळे  अनधिकृत शाळांची माहिती समोर येत आहेत. 
 
बेकायदा शाळेमुळे विद्यार्थ्यांची नुकसान होत आहे.  पालकांचा पैसा वाया जात आहे. पै-पै  जमा करून मुलांना शिक्षण देण्यासाठी पालक प्रयत्न करत आहे. ऐकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण सुरू झाले आहे. अशा बाजार करणार्‍या शाळेच्या मालक , चालकांना शासनाने चांगला धडा दिला पाहिजे.
-समीर शेख, कार्यकर्ते 

Related Articles