स्मृती मंधानाचे अर्धशतक   

मुंबई : महिला प्रिमियर लीगमध्ये खेळवण्यात आलेल्या मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने-सामने आला होता. या सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाने २० षटकांत १९९ धावा केल्या. मात्र यावेळी फक्त ३ महिला फलंदाज बाद झाले. या सामन्यात स्मृती मंधाना हिने ५३ धावा केल्या. आणि शानदार अर्धशतक साकारले. तर तिच्याआधी सलामीवीर मेघना हिने २६ धावा केल्या. तर अ‍ॅलिसा पेरी हिने ४९ धावा केल्या. तिचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले. रिचा घोष हिने ३६ धावा केल्या. जॉर्जिया हिने नाबाद ३१ धावा केल्या. तर ४ अवांतर धावा संघाला मिळाल्या. 

Related Articles