मणिपूर हिंसाचारात उद्ध्वस्त केलेली धर्मस्थळे पुन्हा उभारा   

शहा यांचे निर्देश, मैतेई समुदायाकडून स्वागत 

इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचारात उद्ध्वस्त केलेली धर्मस्थळे पुन्हा उभारण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्या आदेशाचे स्वागत मैतेई समुदायाने केले आहे. राज्यात उफाळून आलेल्या वांशिक हिंसाचारात अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली होती. ती पुन्हा उभारावीत, असे निर्देश शहा यांनी दिले. तसेच या संदर्भात प्रशासनाने योग्य ती पावले टाकावीत, असे सांगितले आहे. त्याचे स्वागत मैतेई समुदायाने केले. मैतेई समुदायाच्या आरामबाई टेंगोल गटाच्या स्वयसेंवकांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात धार्मिक सौहार्द निर्माण करण्यासाठी धर्मस्थळांची पुन्हा उभारणीं करणे काळाची गरज आहे. तसेच धर्मस्थळे मणिपूरची सांस्कृतिक वारसा स्थाने आहेत. त्यामुुळे शहा यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. हिंसाचाराला जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील संघटनेने केली आहे. तसेच कोणीही राज्याच्या ऐक्याला नख लावण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील दिला आहे.

Related Articles