मुंबई : एअर इंडियाचे न्यूयॉर्कला जाणाारे विमान बाँब ठेवल्याच्या भीतीनेे पुन्हा मुंबईकडे वळविण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. विमानाच्या स्वच्छतागृहात बाँब ठेवल्याची एक चिठ्ठी सापडली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ते माघारी परतले.एका प्रवाशाला स्वच्छतागृहात एक चिठ्ठी सापडली होती. त्यात विमानत बाँब असल्याचे लिहिले होते. यानंतर त्याने विमान कर्मचार्यांना माहिती दिली. विमानात १९ कर्मचार्यांसह ३२० जण प्रवास करत होते. अखेर विमान सकाळी साडेदहा वाजता मुंंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. विमानाची आणि साहित्याची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद वस्तू सापडली नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर कंपनीने सर्व विमानांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.दरम्यान, आज (मंगळवारी) न्यूयॉर्ककडे उड्डाण करणार असून प्रवाशांसाठी हॉटेलची व्यवस्था केली आहे.
Fans
Followers