भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्‍याची मित्रासह धिंड   

पुणे : दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध अलिशान मोटार उभी करून दुभाजकावर लघुशंका करणार्‍या गौरव मनोज आहुजा (वय-२५, एनआयबीएम रस्ता) आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय-२५, मार्केटयार्ड) यांची सोमवारी दुपारी शास्त्रीनगर चौकात धिंड काढण्यात आली. गौरव आहुजा याने शनिवारी सकाळी अलिशान मोटार रस्त्याच्या मध्ये लावून भर चौकात लघुशंका केली होती. या घटनेची एका नागरिकाने चित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर टाकली होती. त्यानंतर, सर्वच स्तरातून टीका झाली होती.दरम्यान, गौरव आणि भाग्येश यांच्यावर सार्वजनिक रस्त्यावर आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 
भाग्येशला शनिवारी दुपारी तर गौरवला याला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी संपल्यावर काल दुपारी त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.गौरवने जे कृत्य येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात केले होते. त्याच ठिकाणी त्या दोघांना घेऊन जात पोलिसांनी पंचनामा केला. गौरवचा स्वारगेट परिसरात बीअर बार असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो बारमध्येच होता. कदाचित, मद्यप्राशन करून दोघेही मोटारीने विमाननगर परिसरात गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related Articles