बीड : बीडमधील ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणार्या सतीश भोेसलेचे नवनवीन कारनामे समोर येत असातानाच त्याच्या साडूवरही एक कोटींची खंडणी अन् जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अरफान चव्हाण असे सतीश भोसलेच्या साडूचे नाव आहे. आजिनाथ सावळेराम खेडकर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात चव्हाणसह ९ जणांवर यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादी खेडकर यांनी एका गावात जमीन खरेदी केली होती. खरेदीखत झाल्यानंतर खेडकर कुटुंब जागेचा ताबा घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी संशयित आरोपी चव्हाण आणि त्याच्या सहकार्यांनी खेडकर कुटुंबाला एक कोटीची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर खेडकर कुटुंबाने पोलिस ठाण्यात धाव घेत सात महिला आणि दोन पुरुषांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, भोसलेच्या विरोधातही पाथर्डी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण आणि वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी पोलिस भोसलेच्या मागावर आहेत.
Fans
Followers