अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड   

न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथे असलेल्या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली.श्री स्वामीनारायण मंदिरातील तोडफोडीबाबत, बीएपीएस पब्लिक अफेयर्सने समाज माध्यमावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दुसर्‍या मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. यावेळी ही घटना कॅलिफोर्नियातील चिनो हिल्समध्ये घडली. हिंदू समाज या द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. आम्ही कधीही द्वेषाला रुजवू देणार नाही. 
 
‘द कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’, उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्माची समज सुधारण्याच्या दिशेने काम करणार्‍या संस्थेच्या मंदिराची अशाप्रकारे तोडफोड करणे चुकीचे आहे, याची सखोल चौकशीची करावी, अशी मागणी येथील हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये तथाकथित ‘खलिस्तान जनमत संग्रह’ दिवस जवळ येत असताना हे घडले यात आश्चर्य नाही, असे हिंदू संघटनेकडून समाज माध्यमावर म्हटले आहे. संघटनेने १० मंदिरांची नावे जाहिर केली असून, जेथे गेल्या काही वर्षांत तोडफोड किंवा विटंबनाच्या घटना घडल्या आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका या उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्मासाठी काम करणार्‍या संघटनेने यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांकडे लक्ष वेधले असून, यांची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Related Articles