वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य   

अंदाजपत्रकी अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून

नवी दिल्ली : संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रास आज (सोमवार) पासून सुरूवात होत आहे. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये विविध विषयांवर आक्रमक चर्चा होणार असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्या मध्ये मतदान ओळखपत्रांचे एक सारखे क्रमांक, मणिपूरमधील हिंसाचार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर १०० टक्के वाढीव आयात शुुल्क लागू करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावर भारत सरकारची भूमिका या विषयांवर वादळी चर्चा होणार आहे.
 
सुधारित वक्फ विधेयक आणि मणिपूरच्या अंदाजपत्राला मंजूर करुन घेण्याकडे तसेच अंदाजपत्रकातील तरुतुदी व अनुदानीत मागण्या मंजूर करुन घेण्याकडे सरकारचा कल आहे. मणिपूरधील राष्ट्रपती राजवटीला संसदेची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडतील. अर्थमंत्री निर्मला सीताामन मणिपूरचे अंदाजपत्रक पटलावर मांडतील. मुख्यमंत्री बिरेन सिह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. 
 
विरोधी पक्षांनी सांगितले की, एकच क्रमांक असलेल्या मतदार ओळखपत्रांच्या विषयाकडे सरकाने दुर्लक्ष केले आहे. हा विषय आम्ही अग्रक्रमाने संसदेत मांडणार असल्याचे  तृणमूल काँग्रेसने सांगितले. यानंत निवडणूक आयोगाने जाहीर केले की त्याबाबत सुधारणा येत्या तीन महिन्यात  करण्यात येतील. पश्चिम बंगालमध्ये राज्याबाहेरील नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी त्यांची नावे मतदार यादीत टाकण्यसाठी फेरबदल केला जात असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोपही आयोगाने फेटाळला आहे.  एकाच क्रमांकांची ओळखपत्रे असू शकतात. मात्र, त्यावरील रहिवासी ठिकाण आणि विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र दुसरे असू शकतें, असे आयोगाने स्पष्ट केेले. या विषयावर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, द्रमूक, उद्धव गट निवडणूक आयोगाची सोमवारी भेट घेणार आहेत. ते हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करणार आहेत. 

Related Articles