पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीसह पत्नीची आत्महत्या   

सातारा,(प्रतिनिधी) : पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीसह पत्नीने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पती गणेश ज्ञानदेव मुंडे मूळ यांच्या त्रासाला कंटाळून पत्नी सविता गणेश मुंडे आणि मुलगी जीविका गणेश मुंडे दोन्ही रा. कारंडवाडी(ता. सातारा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.

Related Articles