रोहित-विराटचा जागतिक विक्रम   

दुबई : चॅम्पियन्स चषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स चषकाच्या इतिहासातील हा दुसरा अंतिम सामना ठरला. यापूर्वी चॅम्पियन्स चषक २००० चा अंतिम सामनाही भारत आणि न्यूझीलंडमध्ये झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने चार बळी राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाचे खेळा़डू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या अंतिम फेरीत मैदानावर उतरताच मोठा विक्रम केला.
 
कोहलीचा हा ५५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. ५५० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दुसरा भारतीय ठरला. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने एकूण ६६४ सामने खेळले आहेत.भारत वि. न्यूझीलंड अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम फलंदाजी केली. यासह संघाने १५ षटकांतच ८३ धावा करत ३ महत्त्वाच्या बळी गमावल्या . कुलदीप यादवने २ तर वरूण चक्रवर्तीने १ बळी घेतला  विल यंग १५ धावा, रचिन रवींद्र ३७ धावा तर केन विलियमसन ११ धावा करत बाद झाला.
 
टी-२० विश्वचषक (२००७, २०१४, २०२४) फायनल, २ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना (२०२१, २०२३), ३ चॅम्पियन्स चषकाचा अंतिम सामना (२०१३, २०१७, २०२५) आणि एकदिवसाच्या सामन्यांचा विश्वचषक (२०२३)
 
टी२० विश्वचषक (२०१४, २०२४) अंतिम सामना, जागतिक चॅम्पियनशिप अंतिम सामना (२०२१, २०२३), ३ चॅम्पियन्स चषक (२०१३, २०१७, २०२५) आणि दोन विश्वचषक फायनल (२०११, २०२३)

Related Articles