सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी   

दुबई : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स चषकाच्या सामन्या दरम्यान, भारतासाठी वाईट बातमी समोर आली. भारताचा वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी झाला. सातव्या षटका दरम्यान झेल पकडण्याचा प्रयत्न करत असाताना तो जखमी झाला. यावेळी शमीच्या बोटांतून रक्त वाहिल्याची माहिती आहे. त्यानंतर शमीला भारताच्या फिजीओची मदत घ्यावी लागली आहे. त्यानंतर शमी दुसरे षटक टाकण्यासाठी मैदानात आलेलाही पाहायला मिळाला. त्यामुळे भारताला थोडासा दिलासा मिळाला. 
 
शमी भारताकडून ७ वे षटक टाकत असताना तिसर्‍या चेंडूवर रचिनने एक जोरदार फटका मारला. यानंतर शमीने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू शमीच्या बोटांना लागून हवेत गेला. झेल घेण्यासाठी शमीने चांगले प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले मात्र तो झेल पकडू शकला नाही, उलट त्याच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. संपूणर्र् चॅम्पियन्स चषकादरम्यान, रचिनने चांगली कामगिरी केली आहे.  त्याने ७५ च्या सरासरीने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला आणखी एक संधी देणे भारतासाठी घातक ठरु शकले असते. मात्र, तो स्वस्तात माघारी परतला. 
 
शमी नंतर श्रेयस अय्यरनेही रचिन रवींद्रचा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्यांदा झेल सुटल्यानंतर रचिनने २१ चेंडूमध्ये २९ धावा केल्या होत्या.त्यानंतर दुसर्‍याच षटकात ही संधी मिळाली होती.  ८ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रचिनने मोठा फटका मारला होता. त्यावेळी श्रेयस अय्यरने फटका सोडल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles