लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!   

पंधरा वर्षापासून ’मिळून सार्‍याजणी’ घेतात एसटीची काळजी    

सूर्यकांत आसबे 
 
सोलापूर : चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र मर्यादित न राहता आता प्रत्येक महिला वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहेत. कॅन्टीन पासून ते नासाच्या संशोधनापर्यंत महिलांनी मजल मारली आहे. सुनिता विल्यम सारखी भारतीय वंशाची महिला नासाच्या माध्यमातून अंतराळात गेली आहे. त्याच धर्तीवर देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याबरोबर अनेक महिलांनी संशोधनामध्ये भरारी घेतलेली आहे. आज ग्रामीण भागातील महिलांही शिक्षण घेऊन प्रगती करत आहे. गावगाड्यात राबणारा हात आता संगणकावर बोटे फिरवत आहे. 
   
खूपदा असे वाटते... बाईला एखाद्या पुरुषांपेक्षाही जास्त बाईच सावरू शकते. तिच्यातील आत्मसन्मन जागवू शकते... फक्त प्रत्येकीला हे समजले पाहिजे...बाई पण असेही पेलता येते....ज्योतीचे ज्योतीतून प्रकाशमान होण केव्हाही व्यापकच.. सोलापूर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीची इतर कामे पुरुष वर्गाकडे जरी दिली असली तरी एसटीच्या’ ब्रेकच्या कामाची जबाबदारी मात्र महिला वर्गाकडे देण्यात आलेले आहे. सुसाट धावणार्‍या  एसटीला लावतात मिळून सार्‍याजणी ब्रेक लावतात तिची देखभाल-दुरुस्ती करतात.
   
एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये २०१० मध्ये महिला फोरमनची भरती करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षापासून ३० महिला कर्मचारी एसटीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बुधवार पेठेतील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये करत आहेत.एसटी दुरुस्ती करतानाची ग्रीसिंग, ब्रेक, पार्ट दुरुस्ती, देखभाल, डिझेल भरणे, वेल्डींग, कटिंग, इलेक्ट्रिशन, बॉडी फिटर, इंजिन दुरुस्ती, कुशन दुरुस्ती, हेल्पर, रंगकाम, बस धुणे, स्वच्छता करणे, शीट शिवणे, हाप ग्रेसिंग, फुल्ल ग्रेसींग, टायर पंक्चर अशी कामे सहायक कार्यशाळा अध्यक्षिका श्रीदेवी जमादार, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, यंत्र नियंत्रक शितल बिराजदार, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांच्या मदतीने प्रतिभा काळे, यास्मिन शेख, भाग्यश्री नागणे, भाग्यश्री माशाळे, सुप्रिया चौडे, मंदाकिनी सलगरे, उल्फा जगताप, उपासना वाघमारे, जयश्री कांबळे यांच्यासह सर्व महिला कामगार करत आहेत.

Related Articles