E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘आव्हानांना संधी समजून कार्य केल्यास मनस्वी आनंदाची अनुभूती’
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करत असताना रोज नव्या आव्हानांना सामोर जावे लागते. पुणे शहरातील वाहनांची संख्या, वाहनांशी संबंधित कामाच्या फाइल्सचा डोंगर आणि रोजची कामे कार्यालय बंद होण्याच्या आधी संपविण्याचे आव्हान अशी ही नोकरी आहे. मात्र जबाबदारी स्वीकारून रोजची आव्हाने रोज पूर्ण करण्याचा मनस्वी आनंद मला या नोकरीतून मिळतो. अशी भावना प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी व्यक्त केली.
शहर मोठे असले की, त्या शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्याही मोठी असते. त्यात पुणे हे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे रोज पुणे आणि बारामती कार्यालयाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी लागते. रोजच्या कामाचे नियोजन करावे लागते. सहकारी अधिकारी व कर्मचार्यांकडून केलेल्या नियोजनानुसार कामे पूर्ण करून घ्यावी लागतात. बर्याच वेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास कामाचा ताण वाढत जातो. कारण या कार्यालयात येणारे वाहन चालक किंवा मालक हे सुट्टी घेऊन आलेले असतात. त्यांच्या वेळेत काम न झाल्यास त्यांच्या रोषाला अधिकारी म्हणून सामोरे जावे लागते. एक दिवसाचे काम ठप्प झाल्यामुळे पुढच्या दिवशीच्या कामाचा ताणही वाढणारा असतो. त्यामुळे तांत्रिक गोष्टींचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे ठरते.
कामाच्या नियोजनासह बर्याच वेळा अधिकार्यांची पथके दिवस रात्र रस्त्यांवर काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही अधिकारी म्हणून आपलीच असते. आरटीओ कार्यालयील नोकरी म्हणजे खूप जबाबदारी. मात्र त्या तुलनेत शिकायलाही खूप मिळते. या कार्यालयात महिलांना काम करण्यासाठी खूप संधी आहेत. क्षेत्र कोणतेही असो रोजच्या कामाला आव्हान समजले की ते काम अवघड वाटते. मात्र त्याच कामाला संधी मानल्यास त्या कामाचा मनस्वी आनंद मिळतो. त्यामुळे महिलांनी कोणत्याही कामाला आव्हान न मानता, संधी समजून कार्य करावे, असा सल्लाही अर्चना गायकवाड यांनी दिला.
-अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
Related
Articles
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?