लहान मुलांच्या वादातून दोन गटांत हाणामारी   

पुणे : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून लोणी काळभोर येथील कदम वाकवस्ती परिसरातील ईराणी गल्लीमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांवर धारदार हत्याराने आणि दगड विटांनी तुफान हाणामारी केली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन्ही गटांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ९ जणांना अटक केली आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कदम वाकवस्ती येथील  इराणी गल्लीमध्ये नुकतीच ही घटना घडली.
 
अमिरु खानु ईराणी (वय ५२) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, मजलुम हाजीअली ईरानी (वय ५०), अवनु ऊर्फ अलिरजा राजू ईराणी (वय २६), मोहम्मद मोसन ईराणी ऊर्फ गोजू (वय २२), राजु हुसेन हाजी ईराणी (वय ५०), शाजमान ऊर्फ पठाण हाजीसाब ईराणी (वय ६५), शब्बीर जावेद जाफरी ईराणी (वय ३६), मोहम्मद राजू ईराणी (वय ३२, सर्व रा. ईराणी गल्ली, कदमवाक वस्ती) यांना अटक केली आहे. एकूण १५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या लहान मुलांमध्ये सोमवारी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून दोघांना समज दिली होती.

Related Articles