पुणे : पोलिस प्रशासनाला खोटी साक्ष व खोटे पुरावे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी थेट न्यायालयाने फिर्यादीवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार प्रणील कुसाळे यांनी वकील रमण घोरपडे यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये, दिव्या गुंजाळ, रमेश गुंजाळ, वैशाली गुंजाळ, रितिक गुंजाळ, या चार लोकांवर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळ यांनी कुसाळे याच्या वर खोटे आरोप करत फौजदारी गुन्हे शिरूर पोलीसांना खोटे व बनावट पुरावे देऊन गुन्हे दाखल केले होते. येरवडा पोलीस ठाणे येथे गुन्हा वर्गीकरण केले असताना गुन्हे सिद्ध झाले नसताना दोषारोप पत्रातून संबंधित गुन्ह्याच्या पोलीस तपास अधिकारी (ख.ज) यांनी गुन्हा वगळला होता. कुसाळे यांनी न्यायालयात धाव घेऊन शिरूर पोलिसांना खोटे पुरावे व खोटी माहिती देउन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा युक्तिवाद वकिलांनी कोर्टा समोर पक्षकाराची बाजू मांडून गुंजाळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Fans
Followers