‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४२ वा पदवीप्रदान सोहळा आज (शनिवारी) होत आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि ख्यातनाम उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांना सन्मानीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविले जाणार आहे. 
 
हा सोहळा सकाळी १० वाजता मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात होईल. याप्रसंगी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, सरिता साठे, टिमवी ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर उपस्थित राहणार आहेत. पदवीप्रदान समारंभात १२ विद्यार्थ्यांना पीएच. डी., पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १,०६६ विद्यार्थ्यांना पदवी, पदवी अभ्यासक्रमाच्या २,०६८ विद्यार्थ्यांना पदवी आणि कौशल्य विकास शाखेच्या १४३ विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.

Related Articles