बंडगार्डन : राज्यातील सर्व महिलांनी माहिती अधिकार आणि कायद्याची माहिती घेऊन जागृत राहिले पाहिजे. तरच स्वत:चे सरक्षण करता येईल, असा सल्ला अॅड वकिल असुंता पारधी यांनी दिला. दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या वतीने ४१६ व्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा मार्गदर्शन करताना अॅड पारधी बोलत होत्या. असुंता पारधी या वकीली व्यवसायाबरोबरच चेतना महिला विकास केंद्र ही स्वावलंबी संस्था चालवत असून, अनेकविध समाज हितोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. पारधी म्हणाल्या, महिलांनी कायदे विषयी साक्षर असायला हवे तसेच संविधानामध्ये केलेल्या तरतुदींचा महिला सक्षमीकरणासाठी निश्चित फायदा होईल. घटना तसेच कायद्यामधील अनेक कलमांचा उल्लेख करून त्यांनी उदाहरणासह विश्लेषण केले. घटस्फोट पोटगी पुनर्विवाह महिलांची असुरक्षितता, आरोग्य आणि बालकांचे प्रश्न याविषयी प्रश्न उत्तरे रूपाने चर्चा संवाद घडवून सखोल मार्गदर्शन केले. यावेळी संघ प्रमुख राजू धडे, लक्ष्मण लोंढे, महासचिव संजय केंजळे, मधुकर थोरवे, अशोक लाल सलाम, महिला संघटक कलावती तूपसुंदर, राणी माणिक सोनवणे, शाहीर सदाशिव भिसे व लेखिका सुभा लोंढे, नारायण डोलारे, पोर्णिमा कोलते, दादासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
Fans
Followers