E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
विद्यार्थिनींचे शुल्क खरोखरच माफ झाले का?
Samruddhi Dhayagude
15 Feb 2025
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
पुणे : महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या शुल्क माफीसाठी निर्णयाच्या अंमलबजावणी करीता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या शुल्क माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच राज्यातील शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे; यासाठी राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. सदर निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते.
तसेच उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती. दर निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला, याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील घेण्यास सुरुवात केली असून, आज त्यांनी गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महाविद्यालयामधील विद्यार्थिनींशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
मुलींनी देखील ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून शुल्क माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल. तसेच, विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना यावेळी केली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्चाव हे देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी
राज्यभरातील शंभर महाविद्यालयांना अशा प्रकारे अचानक भेट देऊन मुलींच्या शुल्क माफीचा आढावा घेणार आहे. मुंबईतील वांद्रे येथील थडोमल शहानी महाविद्यालयातून सुरुवात केली. पुण्यातील गरवारे दुसरे महाविद्यालय असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले. ‘कमवा आणि शिका’ तत्वावर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली असता त्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Related
Articles
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
15 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
भूगर्भातील उच्च वीज वाहिन्याचा धोका
14 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
15 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
भूगर्भातील उच्च वीज वाहिन्याचा धोका
14 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
15 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
भूगर्भातील उच्च वीज वाहिन्याचा धोका
14 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
15 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
भूगर्भातील उच्च वीज वाहिन्याचा धोका
14 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)