कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासनात वाढावा : मोदी   

पॅरिस : विविध देशांच्या प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्‍या जातील, अशी भीती बाळगणे अयोग्य आहे. नोकर्‍या तंत्रज्ञानामुळे नव्हे तर त्यात होणार्‍या बदलामुळे नष्ट होत असतात. त्यामुळेे बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 
 
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एआय परिषदेला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी मोदी पॅरिस येथे पोहोचले आहेत. या वेळी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रोन यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मोदी परिषदेचे सह अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने परिषद महत्त्वाची ठरली आहे. 
 मोदी म्हणाले, एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी देशांच्या सरकारनी पुढकार घेतला पाहिजे. त्यासाठी धोरण ठरविले पाहिजे. तसेच परस्परांमध्ये विश्वास वाढीस लावण्यासाठी एआयचा वापर केला पाहिजे. एआय हे शतकातील मानवतेसाठी कोड लिहित आहे.एआय क्षेत्रातील अमेरिकेचे चॅटजिपीटी आणि चीनच्या डीपसेकमध्ये तांत्रिक युद्धाला अगोदरच सुरूवात झाली आहे. चॅटजिपीटीला मागे टाकून डीपसेक पहिल्या क्रमांकावर आणण्याचे चीनचे प्रयत्न सुरू असून डीपसेकचा अमेरिकेच्या शेअर बाजरात शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर एआय परिषद होत आहे. 

Related Articles