धायरी येथील डीपी रस्त्यांसाठी तातडीने कार्यवाही करा   

पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे आदेश 

पुणे : धायरी गाव व सिंहगड परिसरातील रखडलेल्या चारही डिपी रस्त्यांसाठी कायदेशीर भुकंपादनासह सर्व कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश काल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागाला दिले.रखडलेल्या डीपी रस्त्याच्या  निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने धायरी येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांसमवेत सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी काल बैठक झाली. 
 
त्यावेळी आयुक्तांनी रखडलेल्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आदेश दिले अशी माहिती पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिली. प्रजासत्ताकदिनी अन्नत्याग आंदोलनाची आमदार भिमराव तापकीर यांनी भेट घेतली. यावेळी आमदार तापकीर तसेच पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. तसेच आठ दिवसांत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.
 
२८ वर्षांपासून रखडलेल्या धायरी गावातील डीपी रस्त्यांना कोणी वाली उरला नाही. वर्षानुवर्षे  डीपी रस्ते कागदावरच आहेत .पर्यायी रस्ते नसल्याने धायरी गावासह इतर रस्त्यावर  वाहतूक कोंडीची गंभीर बनली आहे. रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेत.  सिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही हा रस्ता कागदावरच आहे.

Related Articles