सोलापूरकरांकडून भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा   

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक संघटनांकडून, शिवप्रेमींकडून आंदोलन करत त्यांना विरोध केला गेला. सर्वांच्याच संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सोलापूरकर भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदी होते. आंदोलकांकडून सोलापूरकर यांनी या पदाचा राजीनामा द्यावा आधी मागणी करण्यात अली.  अखेर त्यांनी राजीनामा दिला असून संस्थेनं त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे.
 
काय होते वादग्रस्त वक्तव्य?
 
“छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते. परंतु, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून महाराष्ट्रात आले होते,” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं.विविध पक्ष तसंच संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

Related Articles