E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; साडेतीन कोटी परत मिळविण्यात यश
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
पिंपरी
: सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ३ अब्ज ४२ कोटी ४२ लाख ७५ हजार ६९६ रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी केवळ सव्वा टक्के म्हणजे ३ कोटी ६८ लाख ४९ हजार ४५ रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या २२ हजार ९५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि पोलिसांना केवळ ८२ आरोपींना अटक करता आली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ आणि पोलिसांचे अपयश पाहता नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला फसवून पैसे हडपण्याच्या तयारीत आहेत. लॉटरी, बक्षिसे मिळाल्याचे आमिष दाखविले जाते. तसेच इन्स्टाग्राम, फेसबुकच्या खात्यांवरही हॅकर्सची नजर आहे. सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या २२ हजार ९५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गुन्ह्यांपुढे आणि गुन्हेगारांपुढे पिंपरी-चिंचवड पोलीस पुरते हतबल झालेले दिसून येत आहेत.
तुमच्या नावाने एक भेटवस्तू कस्टममध्ये अडकल्याचे सांगितले जाते. कुरिअरचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून ती वस्तू तुम्हाला पाठविण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती मागितली जाते. ठराविक पैसे भरल्यास वस्तू मिळेल, असे सांगून एक क्युआर कोड पाठवून काही मिनिटात तुमचे खाते रिकामे केले जाते. तसेच तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून तुम्हाला घाबरवतात. बनावट पोलिसांकडून तुमच्यावर अटकेच्या कारवाईची धमकी देऊन इतकेच नव्हे, तर तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे खोटे पत्रच पाठवून देतात.
डिजिटल अरेस्ट
या फसवणुकीत अडकल्याचे भासवले जाते. तपासाच्या नावाखाली तुम्हाला एका एकांतस्थळी (एखाद्या खोलीत) जाण्यास सांगून डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगण्यात येते. पुढे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमच्या घरी पोलीस पाठविण्याची धमकी दिली जाते.
व्हॉटस अॅप, फेसबुक अकाऊंट हॅक
तुमच्या खात्यात प्रवेश करून तुमच्या नावाने जसेच्या तसे नवीन खाते तयार केले जाते. तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मॅसेज पाठवून रुग्णालयात असल्याचे, आर्थिक अडचणीचा बहाणा करून मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी होते. अशावेळी खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत. ‘फेक प्रोफाइल’ रिपोर्ट करताना प्रोफाइलच्या उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा. पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त, माजी महापालिकेचे आयुक्त, इतर पोलीस अधिकारी, वकील, डॉक्टरांच्या नावाने अशा प्रकारची अकाऊंट काढून फसवणुकीच्या प्रयत्नांचे प्रकार समोर आले आहेत.
येथे मिळेल मदत
सायबर फसवणूक झाल्यास १९३० डायल करा किंवा लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या वेबसाइटवर आपली तक्रार नोंदवा. मदतीसाठी डायल ११२ करा.
पहिल्या तासाभरात ऑनलाइन तक्रार करासायबर गुन्ह्याची संख्या वाढत चालली असून, त्यापासून स्वतःचा बचात करण्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर येणार्या अनोळखी क्रमांक, लिंकपासून दूर राहा. सायबर फसवणुकीनंतर पहिल्या तासात तातडीने ऑनलाईन तक्रार नोंदविल्यास तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम ‘फ्रीज’ करणे शक्य होते.
खोट्या ई-मेलद्वारे फसवणूक
सरकारी अधिकारी असल्याचे सांगून योजनांची माहिती देणारे मेल येतात, फेक लिंक पाठवून तुमची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होतो. ई-मेलद्वारे तुमच्या सिस्टीममध्ये व्हायरस सोडण्याचा प्रयत्न केला जातो. धमकावून तुमचे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.
सुरक्षित बँकिंगसाठी खबरदारी हवीच तुमच्या पासवर्डमध्ये वैयक्तीक किंवा कार्यालयीन माहिती कधीही वापरू नका. तुमच्या खात्याचा पासवर्ड नियमित अंतराने बदलावा. कामाचे सत्र पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन खात्यातून बाहेर पडताना ‘लॉग ऑफ’ करणे विसरू नका. ऑनलाइन खात्याचे पासवर्ड कधीही कोणाशी शेअर करू नका.
Related
Articles
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)