व्हॉट्सऍप कट्टा   

प्रसंगाचे भान ठेवावे
एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत.
एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल?
सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसर्‍या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसर्‍या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.
उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, हे हंस गोल गोल काय नेत आहेत? कासव रागावले. ते हंसाला म्हणणार होते- या मूर्खांना एवढेही समजत नाही का? त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.
तात्पर्य : समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.
--------------
अँँकर : सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची?
मनोहर : पावसाळ्याची भीती वाटायची.
अँकर : ते कसं?
मनोहर : रात्रभर पडणारा पाऊस, सकाळी शाळेत जातांना नेमका बंद व्हायचा.
ट्रेन मध्ये बसलेली महिला त्यांच्या लहान मुलाला सारखे-सारखे सांगत होत्या. ’सोन्या..., खा लवकर लवकर नाहीतर, हा गाजराचा हलवा त्या काकांना देऊन टाकेन!’ शेवटी समोर बसलेले काका वैतागून म्हणाले, अहो वहिनी, काय करायचं ते लवकर ठरवा,  तुमच्या हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!
-------------
काचेला पारा लावला की आरसा तयार होतो..
पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो.
------------
बेरोजगारला समानार्थी शब्द सांगा...
उत्तर
आमचे युवा नेते, आमचे कट्टर समर्थक 
आमचा ढाण्या वाघ, 
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
भावासारखा मित्र, गावची बुलंद तोफ
तालुक्यातील वादळ, भावी सरपंच
भावी नगरसेवक, आमचे काळीज
आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक 
आमचे आधारस्तंभ, खंबीर युवा नेतृत्व
तालुक्याची शान, 
आमचे आशास्थान
भले खायला भातावर आमटी का नसंना... 
 

 

Related Articles