टिळकवाड्यातील मंदिरात गणेशजन्म सोहळा उत्साहात   

पुणे : गणेश जयंतीनिमित्त टिळकवाड्यातील गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेशजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.  ब्रह्मवृदांच्या उपस्थितीत श्रीअथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करण्यात आली. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. 
 
वेदमूर्ती कौस्तुभ खळकीर, नितीन कुलकर्णी, मनोज जोशी, अमोल धर्माधिकारी, शिरीष जोशी, नरेंद्र देशमुख, अमित महाजन व चिंतामणी  घैसास यांनी सहस्त्रावर्तन अभिषेक केला.गणेश जयंतीनिमित्त टिळकवाड्यातील गणेश मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच गणेश मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरासमोर आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. दिवसभर भक्तांनी गणरायांचे दर्शन घेतले.

Related Articles