E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
वायनाडमध्ये बचावकार्यात हवामानामुळे अडचणी
Samruddhi Dhayagude
31 Jul 2024
सैन्य, नौदलाच्या मदतीने बचावकार्य सुरू
वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनांच्या मालिकेमुळे हाहाकार माजला असून अद्याप बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. सैन्य, नौदल आणि एनडीआरएफस स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलांच्या पथकांनी शोध व बचावकार्य हाती घेतले असले, तरी मुसळधार पाऊस आणि खराब हवेमुळे त्यात अडचणी येत आहेत.भूस्खलनानंतर पोतुकल गावामध्ये चलियार नदीमधून १६ मृतदेह आढळून आले आहेत. त्याबरोबरच बचाव कर्मचाऱ्यांना नद्या आणि चिखलामधून शरीराचे अवयव सापडले. ते एकाच व्यक्तीचे आहेत की वेगवेगळ्या याची ओळख पटवण्यासाठी वैद्याकीय तपासणी केली जात आहे. वायनाड हा डोंगराळ भाग आहे. भूस्खलनांची तीव्रता इतकी होती की त्यामुळे काही गावे पूर्णत: ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्तींचा शोध घेतला जात असून जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथके अहोरात्र काम करत आहेत. बचाव कर्मचाऱ्यांना नद्या आणि चिखलामधून शरीराचे अवयव सापडत आहेत. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा निश्चित करणे कठीण आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.
केरळ सरकारने बचाव मोहिमेसाठी लष्कराची मदत मागितल्यानंतर ‘१२२ इन्फंट्री बटालियन मद्रास’चे ४३ सदस्यीय पथक पाठवण्यात आले आहे. त्याबरोबरच २०० जवान, वैद्याकीय पथके, कन्नूरच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स’ (डीसीएस) केंद्राकडून उपकरणे आणि कोझिकोडमधून प्रादेशिक सैन्य तैनात करण्यात आले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही दुर्घटनाग्रस्त भागात पाठवण्यात आली आहेत. कन्नूरमधून नौदलाची ‘रिव्हर क्रॉसिंग टीम’ आणि सैन्याचे श्वानपथकदेखील सहभागी झाले आहेत.
शहारे आणणारे अनुभव
या दुर्घटनेतून वाचलेल्या काहींनी आपापले अनुभव सांगितले. एका वयस्कर दाम्पत्याचे घर उद्ध्वस्त झाले. मात्र, त्यापूर्वीच आदल्या रात्री ११ वाजता त्यांना चिखलाचे पाणी वाहताना दिसले. त्यानंतर त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांनी शेजाऱ्यांनाही बरोबर यायला सांगितले. ‘‘पण त्यांनी ऐकले नाही, रात्री १ वाजता येतो असे ते म्हणाले. पण आता ते आलेच नाहीत. आता ते दिसत नाहीत,’’ असे या वयोवृद्ध इसमाने गदगदलेल्या स्वरात सांगितले. एका महिलेने तिला तिच्या नातेवाईकांनी फोन केल्याचे सांगितले. ते त्यांच्या बाळाला घेऊन निघाले होते, मात्र नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
केरळच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून घटनेची माहिती घेतली. केंद्रातर्फे शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी बुधवारी सकाळी वायनाडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Related
Articles
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे
20 Jan 2025
अध्यात्मातील ज्ञानतारा निखळला
21 Jan 2025
बालगंधर्व नाट्यगृहात मराठी चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद
21 Jan 2025
कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार
15 Jan 2025
पीएमपीच्या २२५ कर्मचार्यांचे रक्तदान
20 Jan 2025
अभिनेता सैफ अली चाकू हल्ल्यात जखमी
17 Jan 2025
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे
20 Jan 2025
अध्यात्मातील ज्ञानतारा निखळला
21 Jan 2025
बालगंधर्व नाट्यगृहात मराठी चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद
21 Jan 2025
कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार
15 Jan 2025
पीएमपीच्या २२५ कर्मचार्यांचे रक्तदान
20 Jan 2025
अभिनेता सैफ अली चाकू हल्ल्यात जखमी
17 Jan 2025
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे
20 Jan 2025
अध्यात्मातील ज्ञानतारा निखळला
21 Jan 2025
बालगंधर्व नाट्यगृहात मराठी चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद
21 Jan 2025
कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार
15 Jan 2025
पीएमपीच्या २२५ कर्मचार्यांचे रक्तदान
20 Jan 2025
अभिनेता सैफ अली चाकू हल्ल्यात जखमी
17 Jan 2025
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे
20 Jan 2025
अध्यात्मातील ज्ञानतारा निखळला
21 Jan 2025
बालगंधर्व नाट्यगृहात मराठी चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद
21 Jan 2025
कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार
15 Jan 2025
पीएमपीच्या २२५ कर्मचार्यांचे रक्तदान
20 Jan 2025
अभिनेता सैफ अली चाकू हल्ल्यात जखमी
17 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जबाबदारीचे तत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजावे
2
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
3
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
4
कलंकित‘ट्यूलिप’!
5
परदेशस्थ ‘देशी’ (अग्रलेख)
6
सत्यं, शिवं, सुंदरम !