E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत रंगणार
Samruddhi Dhayagude
11 Feb 2024
बारामती लोकसभा मतदारसंघ
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पारंपरिक बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची कन्या, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी धरला आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या बारामती तालुका आणि पुणे जिल्हा शाखेने अशा प्रकारचा प्रस्ताव पक्षनेतृत्वाकडे पाठवला आहे.
खासदार सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात, यासाठीचा आग्रह महायुतीकडे केला आहे. त्यानुसार, महायुतीकडून त्या जागा त्यांना मिळतीलही. त्यासाठी अजित पवारांनी उमेदवार चाचपणीसाठी सुरुवात केली आहे. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना देवकाते यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहेे; मात्र भाजपकडून या नावांना होकार मिळत नाही. सद्य:स्थितीत भाजपने लोकसभा निवडणुकीत जागा वाढविण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असलेल्या नावांना यश तर राहोच; मात्र मोठा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांनी अन्य नावे सुचविण्याचे सोडून स्वत:च्या पत्नीला उभे करण्याचा आग्रह भाजपकडून धरला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना जर उमेदवारी जाहीर झाली, तरच निवडणूक चुरशीची होऊ शकते. कारण 1992 मध्ये अजित पवार यांनी बारामती लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या फरकाने जिंकली होती.
त्यावेळी अजित पवार काँग्रेसमध्ये होते. त्याचबरोबर शरद पवारांचा करिश्मा होता. त्यांच्या पाठबळावर यश मिळाले. आज परिस्थिती पूर्वीची नाही. अजित पवारांनी ज्या पद्धतीने शरद पवारांना सोडून टीका केली आहे. ती टीका सर्वसामान्यांना रुचलेली नाही. आज मतदारसंघातील सहकारातील पदावर असलेले नेते सोडता उर्वरित कार्यकर्ते उघड-उघड भूमिका मांडण्यास तयार नाहीत. हे कार्यकर्ते सध्या तरी कोणाची बाजू घ्यायची, या मानसिकतेत दिसत नाहीत. मात्र, शरद पवारांवर प्रेम करणारा पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आजही सुळे यांच्याबरोबर आहे.
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे-पाटील यांच्याबद्दल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मराठा समाज रुष्ट आहे. विकासकामे आणि त्यासाठी निधी मिळण्यासाठी आपण भाजपबरोबर गेल्याचे अजित पवारांकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात निधीचे वाटप करताना ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळाली त्या त्या वेळी त्यांनी अन्य तालुक्यांवर अन्याय केल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती आणि अन्य तालुका केंद्राच्या प्रशासकीय इमारती, एसटी स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र असो की, अन्य विकासकामे पाहिल्यास मोठा फरक आढळून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील बारामती वगळता अन्य तालुक्यांतील महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे दिसत नाही. भोरचा राजगड सहकारी साखर कारखाना, दौंडचा भीमा-पाटस कारखाना विरोधकांच्या ताब्यात असल्याने त्यांना मदत केलेली नाही. पुरंदरचा गुंजवणी प्रकल्प असो, की आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या 5 वर्षांत कोणतीही प्रगती नाही. ज्या पद्धतीने बारामतीच्या विकासासाठी अजित पवार मोठा निधी आणतात, असा निधी या लोकसभा मतदारसंघातील अन्य तालुक्यांत आणला आणि एखादा प्रकल्प पूर्ण केला असे कोणी म्हणत नाही.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडे भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर हवेलीचे आमदार आहेत. तर बारामती, इंदापूर, हवेली, खडकवासला या 4 विधानसभेचे आमदार महायुतीचे आमदार आहेत. अजित पवारांनी युतीच्या मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार संघटनात्मक बांधणीकडे आता लक्ष देऊ लागले आहेत. स्वत: शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघात तळ ठोकणार आहेत. त्यावेळी नेते आणि कार्यकर्ते यांची भूमिका निश्चित होणार आहे. दुसरीकडे, खासदार सुळे यांनी मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महिलांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत दौंड, आणि बारामती येथे महिला मेळावे नुकतेच घेण्यात आले आहेत
सद्य:स्थितीत सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी निवडणूक होणार असल्याची चर्चा गावोगाव रंगू लागली आहे. यामुळे गावगाडा हाकणारे गावपुढारी आतापासून साहेबांबरोबर जायचे का? दादांबरोबर? याचा आराखडा बांधू लागले आहेत.
Related
Articles
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
10 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
‘अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या ३८८ नागरिकांची ओळख पटली
15 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)