E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
पुणे
: कंपनी अस्तित्त्वात नसताना तिच्या नावे बनावट १०४ कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची खाती (ईपीएफओ) उघडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ईपीएफओ कार्यालयात आणि संकेतस्थळावर २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे पाच वषार्र्ंमध्ये ही कर्मचारी खाती बनावट असल्याचे ईपीएफओ कार्यालयाला समजलेच नाही. दरम्यान, यातील काही कामगारांना ईपीएफओची खाती रद्द करण्यासाठी धमकावून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट खाती उघडण्यात आल्याचे समजल्यानंतर त्याबाबत तक्रार करण्यास ईपीएफओ कार्यालयाने तब्बल ८ महिन्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटनाचे इन्फोर्समेंट अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. श्री गणेश इंटरप्रायजेस प्रो. प्रा. सिताराम ठकाणसिंग (साठेवस्ती, सणसवाडी) यांनी ईपीएफओच्या संकेतस्थळावर श्री गणेश इंटरप्रायजेस नावाने ईपीएफओचा कोड नोंदणी करण्यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यांना संघटनेकडून कोड नंबर देण्यात आला. या कंपनीमध्ये २०२० ते २०२४ मध्ये १०४ कामगारांची पीएफ खाती ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आली आहेत.
श्री गणेश इंटरप्रायजेस या अस्थापनेत देशातून वेगवेगळ्या राज्यातील ११ कर्मचारी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्राद्वारे, ईमेलद्वारे जून व जुलै २०२४ मध्ये तक्रारी केल्या. त्यात त्यांनी श्री गणेश इंटरप्रायजेस मध्ये त्यांनी कधीही काम केलेले नाही़ त्यांचे संमतीविना परस्पर त्यांचे नावे श्री गणेश इंटरप्रायजेस मध्ये पीएफची बनावट खाती उघडली आहेत. त्यांना ही पीएफची खाती रद्द करण्यासाठी कोणीतरी व्हॉटसअॅपवरुन मेसेज पाठवून पैसे मागत आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत ४ कर्मचार्यांनी ते रहात असलेल्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या आहेत.
भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त यांनी श्री गणेश इंटरप्रायजेस कंपनी व कंपनी मालकाची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश १८ व २४ जुलै २०२४ रोजी दिले होते. त्यानुसार तक्रारदार व त्यांचे सहकारी डी एस तिलवणकर, प्रवर्तन अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी शिरुरमधील सणसवाडी येथील साठे वस्तीवर गेले. तेथे जाऊन पडताळणी केल्यावर त्या पत्यावर श्री गणेश इंटरप्रायजेस नावाची कोणतीही संस्था आढळून आली नाही. तसेच, तेथील परिसरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर त्या नावाची कोणतीही व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाली नाही. सणसवाडी ग्रामपंचायतीत चौकशी केल्यावर तेथेही श्री गणेश इंटरप्रायजेस नावाची संस्था किंवा कंपनी मालक सिताराम ठकाणसिंग यांची नावे आढळून आली नाही.
तसा अहवाल त्यांनी १ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यालयाला दिला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर भविष्य निर्वाह कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सिताराम ठकाणसिंग याने केवळ पीएफ खातीच बनावट काढली नाही तर शॉप अॅक्ट लायसन्स ही बनावट काढले आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करीत आहेत.
Related
Articles
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद
18 Apr 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ८ पदके
18 Apr 2025
गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद
18 Apr 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ८ पदके
18 Apr 2025
गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद
18 Apr 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ८ पदके
18 Apr 2025
गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद
18 Apr 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ८ पदके
18 Apr 2025
गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!