E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई
, (प्रतिनिधी) : वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी अॅग्रीगेटर सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी, असा प्रयत्न झाला तेव्हा रिक्षाचालक आणि मालक संघटनेने त्याला जोरदार विरोध केला होता.
राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक (अॅग्रीगेटर) सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बाईक टॅक्सी वाहनांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणार्या समुच्चयकांना इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या धोरणांतर्गत सेवा देणार्या अॅग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरिता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबाबतच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक असेल.
ई बाइकमुळे नागरिकांना एक जलद व स्वस्त पर्याय उपलब्ध होईलच; पण, प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिला सुरक्षेच्यादृष्टीने काही नियमावली बनवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात २० हजार रोजगार तयार होतील. १० हजारांहून अधिक रोजगार निर्मिती मुंबईतच होणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ई बाइक टॅक्सीला रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.
परिवहन प्राधिकरण ठरवणार भाडे
इ-बाइक टॅक्सीच्या प्रवासी भाड्याचे दर हे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे निश्चित करण्यात येतील. केवळ २० ते ५० वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देता येणार आहे. तसेच, यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाच्या पर्यायासह ‘लास्ट माईल कनेक्टिव्हीटी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे. शहरातील प्रदूषण व वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार असून नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
Related
Articles
प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर
08 Apr 2025
देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात
09 Apr 2025
एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास
04 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम.ए. बेबी
07 Apr 2025
प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर
08 Apr 2025
देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात
09 Apr 2025
एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास
04 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम.ए. बेबी
07 Apr 2025
प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर
08 Apr 2025
देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात
09 Apr 2025
एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास
04 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम.ए. बेबी
07 Apr 2025
प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर
08 Apr 2025
देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात
09 Apr 2025
एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास
04 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
वाचक लिहितात
04 Apr 2025
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम.ए. बेबी
07 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मतांसाठी ‘सौगात’
4
विश्वासही द्या (अग्रलेख)
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !