E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४१ रुपयांची कपात
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा निर्णय
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 'ऑईल मार्केटिंग कंपन्यां'नी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ४१ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन किमती आजपासून (१ एप्रिल २०२५) लागू झाल्या आहेत.
ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून लागू झालेल्या या नवीन कपातीनंतर, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७१४.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १७५५.५० रुपये होती. तर, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १८७२ रुपये झाली आहे, जी पूर्वी १९१३ रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १९२४ रुपये झाली आहे, जी पूर्वी १९६५ रुपये होती. आता दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १७६२ रुपये झाली आहे. जी या कपातीपूर्वी १८०३ रुपये होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर
घरगुती १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.
दर महिन्याच्या १ तारखेला किमतींमध्ये बदल
ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करतात. कंपन्या गरजेनुसार गॅस सिलिंडरच्या किमती वाढवतात किंवा कमी करतात. या कंपन्यांनी गेल्या महिन्यात १ मार्चपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती. पण आता या महिन्याच्या सुरुवातीला त्यामध्ये ४१ रुपयांची कपात केली.
Related
Articles
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
08 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
मीठ, फर्निचर उद्योगात मोठी वाढ
08 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
आरोग्य विमा योजनेत मिळवा अतिरिक्त कवच
08 Apr 2025
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
08 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
मीठ, फर्निचर उद्योगात मोठी वाढ
08 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
आरोग्य विमा योजनेत मिळवा अतिरिक्त कवच
08 Apr 2025
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
08 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
मीठ, फर्निचर उद्योगात मोठी वाढ
08 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
आरोग्य विमा योजनेत मिळवा अतिरिक्त कवच
08 Apr 2025
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
08 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
मीठ, फर्निचर उद्योगात मोठी वाढ
08 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
आरोग्य विमा योजनेत मिळवा अतिरिक्त कवच
08 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप