E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
कायदा व सुव्यवस्था रसातळाला, राज्याला हवा पूर्णवेळ गृहमंत्री
मुंबई, (प्रतिनिधी) : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही तर गुंडांचे राज आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता तुरुंगामध्ये पोहोचले आहे. पोलिस आणि गृहविभाग काय करत आहे? असा सवाल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पण सरकारला याचे काही गांभीर्य आहे असे दिसत नाही. राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सरकारी आशिर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, मद्य, कोळसा माफिया तयार झाले आहेत. ते दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत. खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते, ही बाब राज्याला लाज आणणारी आहे.
भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातल्या जंगलराजसोबत होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाला आहे, असे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधार्यांच्या आशिर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजाल इतकी वाढली आहे की आता बीडच्या तुरुंगामध्ये कराड आणि गित्ते या दोन टोळ्यांमध्ये गँगवार सुरु झाले आहे. त्यामुळेच बीड तुरुंगामधून महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवल्याचे वृत्त येत आहे.
Related
Articles
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
09 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
09 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
09 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
09 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप