E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
अमेरिकेने इराणसमर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ला करण्यापूर्वी युद्धाची व्यूहरचना ‘सिग्नल’ या मेसेजिंग अॅपवर ठरवली. मात्र, एका चुकीमुळे या अॅपवरील युद्ध व्यूहरचना लीक झाली. हे अॅप किती सुरक्षित आहे?
सिग्नल अॅप काय आहे?
‘सिग्नल’ हे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप आहे. या अॅपवरून टेक्स्ट मेसेजिंग, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल तसेच एक हजार नागरिकांचा गट तयार करता येतो. सिग्नल अॅप वापरण्यासाठी व्हॉट्सअॅपप्रमाणे मोबाइल क्रमांकाची आवश्यकता आहे. इतर मेसजिंग अॅप्सप्रमाणे सिग्नल अॅप वापरकर्त्यांचा कोणताही डेटा संग्रहित किंवा ट्रॅक करत नाही. या अॅपची कोर-कोडिंग सार्वजनिक आहे. त्यामुळे हे अॅप इतर अॅपच्या तुलनेत सुरक्षित मानले जाते.
सिग्नल अॅप किती सुरक्षित
हे अॅप मेसेजर्सद्वारे संचालित केंद्रीय सर्व्हर्सवर काम करते. हे फक्त वापरकर्त्याचा फोन नंबर, पहिल्या लॉगिन आणि शेवटच्या लॉगिनची माहिती संग्रहित ठेवते. वापरकर्त्यांच्या संपर्कांची यादी, चॅट आणि इतर माहिती फक्त वापरकर्त्याच्या उपकरणात संग्रहित असते. या अॅपमध्ये ऑटो-डिलीटचा पर्याय देखील आहे, जो एका निश्चित वेळानंतर चॅट ऑटोमॅटिकपणे काढून टाकतो. सिग्नलचा दावा आहे की, तो आपल्या वापरकर्त्यांचा डेटा कोणत्याही जाहिराती किंवा मार्केटिंग एजन्सीसोबत शेअर करत नाही.
संरक्षण मंत्री, लष्करी अधिकारी वादाच्या भोवर्यात
संरक्षण मंत्री पीट हेगसेठ आणि उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्यासह ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी अत्यंत संवेदनशील लष्करी कारवाईवर चर्चा करण्यासाठी ‘सिग्नल’ हे मेसेजिंग अॅप वापरले. ज्या गु्रपमध्ये युद्धाची व्यूहरचना ठरवली गेली, त्या १८ जणांच्या गु्रपमध्ये अनवधानाने अटलांटिक मासिकाचे मुख्य संपादक जेफरी गोल्डबर्ग यांचा समावेश झाला होता. अमेरिकेने हुथी बंडखोरांवर हल्ले करण्याच्या काही तास आधी गोल्डबर्ग यांनी अॅपवर झालेल्या चर्चेचा तपशील प्रसिद्ध केला. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आता वादाच्या भोवर्यात आहेत.
हल्ल्याची व्यूहरचना कशी झाली लीक?
जेफरी गोल्डबर्ग यांना ११ मार्च रोजी सिग्नल अॅपवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्ज यांच्याकडून ‘हुथी पीसी स्मॉल गटा‘चे निमंत्रण मिळाले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना त्या गटामध्ये सामील करण्यात आले. ट्रम्प यांचे जवळचे सहकारी त्या गटामध्ये होते. येमेन हवाई हल्ल्याच्या गोपनीय तपशिलांवर या गटात चर्चा झाली. सुरूवातीला गोल्डबर्ग यांना ते खोटे वाटले; मात्र, लवकरच त्यांना ते वास्तव असल्याचे समजले. त्यानंतर गोल्डबर्ग तातडीने या गटातून बाहेर पडले असले तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते चिंताजनक होते.
युद्धाची धोरणे, शस्त्रांच्या वापरावर चर्चा
या गटात उपाध्यक्ष जेडी वेन्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांसारखे मोठे अधिकारी सहभागी होते. युद्धाची धोरणे, शस्त्रांचा वापर आणि संभाव्य लक्ष्यांवर या गटात चर्चा झाली होती.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका?
येमेनच्या हवाई हल्ल्याचा तपशील उघड झाल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. गुप्तचर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, अशा प्रकारामुळे शत्रूंना युद्धाची व्यूहरचना उघड होऊ शकते आणि त्याचा फटका अमेरिकेला बसू शकतो. सुरक्षा विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या गोपनीय लष्करी माहितीचा गैरवापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये पेंटागॉनच्या लीक झालेल्या कागदपत्रांमुळे युक्रेन आणि चीनबाबत गुप्तचर यंत्रणांची माहिती उघड झाली होती.
गंभीर चूक नाही : ट्रम्प
या प्रकाराकडे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले आहे. ही चूक गंभीर नाही आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ यांना आपला पाठिंबा कायम आहे, असे ट्रम्प यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. दरम्यान, संवेदनशील माहिती निष्काळजीपणे हाताळल्याबद्दल डेमोक्रॅटिक खासदारांनी ट्रम्प प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकाराची चौैकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Related
Articles
कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
25 Apr 2025
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
24 Apr 2025
कॅब चालकही घेणार मीटरप्रमाणे भाडे
20 Apr 2025
एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात
23 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
19 Apr 2025
कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
25 Apr 2025
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
24 Apr 2025
कॅब चालकही घेणार मीटरप्रमाणे भाडे
20 Apr 2025
एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात
23 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
19 Apr 2025
कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
25 Apr 2025
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
24 Apr 2025
कॅब चालकही घेणार मीटरप्रमाणे भाडे
20 Apr 2025
एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात
23 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
19 Apr 2025
कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले
25 Apr 2025
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
24 Apr 2025
कॅब चालकही घेणार मीटरप्रमाणे भाडे
20 Apr 2025
एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात
23 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
19 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
भाजपची तामिळ खेळी
3
सुखधारांची प्रतीक्षा
4
वाहन उद्योग वेगात
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
बीडमध्ये महिला वकिलाला बेदम मारहाण